🙏 आमचा परिचय 🙏
नमस्कार, मी तुमचा ॲड. मंदार गोविंद टावरे
राजकारणाबरोबरच सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याने समाजासाठी काहीतरी देणं लागतो, ही भावना मनात कायम राहिली आहे. माझे बालपण श्री. गोविंदजी टावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले. समाजातील गरजू लोकांना मदत करणे, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळवून देणे, आरोग्य विषयक उपक्रम राबवणे यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
२००५ पासून भारतीय जनता पार्टीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत असून विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. प्रभागातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य आणि वाहतूक या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून काम केले आहे.
कोरोना काळात नागरिकांसाठी कार्यालय खुले ठेवून औषधोपचार, अन्नधान्य आणि वैद्यकीय मदत पोहोचवली. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी ऑनलाईन व प्रत्यक्ष सेवा सुरू केल्या. प्रभागाचा विकास अधिक नियोजनबद्ध आणि आधुनिक पद्धतीने व्हावा, हेच माझे ध्येय आहे.
तुमचा विश्वास आणि पाठिंबा माझ्या पाठीशी असेल, तर मी प्रभागाचा विकास अधिक वेगाने घडवून आणेन.
आपला,
ॲड. मंदार गोविंद टावरे
नमस्कार, मी तुमची अलका पप्पू म्हात्रे
प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, सप्रेम नमस्कार.
मी अलका पप्पू म्हात्रे, भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत स्थानिक उमेदवार म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. माझे पती श्री. पप्पू म्हात्रे यांनी गेली १० ते १५ वर्षे प्रभागाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या कार्यातून मला जनसेवेची प्रेरणा मिळाली.
महिला सशक्तीकरण, आरोग्य सेवा, स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक उपक्रम यासाठी मी सातत्याने काम केले आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर उपाय शोधणे, हेच माझे कार्य राहिले आहे. अनेक विकासकामांत सक्रिय सहभाग घेतला आहे.
भाजप हा राष्ट्रहित, विकास आणि सुशासनावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. केंद्रात नरेंद्र मोदीजी आणि राज्यात देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासाला महानगरपालिकेतही गती देण्यासाठी तुमचा पाठिंबा आवश्यक आहे.
आपल्या सहकार्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास निश्चितच साधता येईल.
आपली,
सौ. अलका पप्पू म्हात्रे
नमस्कार, मी तुमची कविता मिलिंद म्हात्रे
तुमचा सातत्याने जनतेशी संवाद ठेवणारी, मी भाजप पॅनल क्र. २९ मधील उमेदवार म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. UPSC परीक्षा दिल्यानंतर पुढे अधिक शिक्षण असताना अनेक मोठी संधी उपलब्ध असतानाही सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला. नागरिकांचे प्रश्न सातत्याने प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्यावर मार्ग काढणे हेच माझे कार्य राहिले आहे.
मी केवळ आश्वासन देणारी नाही, तर प्रत्यक्ष कृती करणारी कार्यकर्ती आहे. नागरिकांच्या पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वाहतूक अशा मूलभूत प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. कोविड काळात नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्य केले. जनतेचा आवाज बनून प्रशासनाशी समन्वय साधणे हेच माझे ध्येय आहे.
आज डोंबिवलीला अपेक्षित आहे – “बदल”. हा बदल केवळ भाषणात नव्हे, तर कृतीत आणि परिणामात दिसणारा असावा. प्रत्येक नागरिकाची गरज वेगळी असली तरी भावना एकच आहे – सुरक्षित, स्वच्छ आणि विकसित शहर.
हिंस्रतेपेक्षा संवाद, अन्यायापेक्षा न्याय आणि राजकारणापेक्षा लोककल्याण याला प्राधान्य देणारा विकास हा माझा संकल्प आहे. तुमचा विश्वास आणि पाठिंबा माझ्या पाठीशी असेल, तर डोंबिवलीचा सर्वांगीण विकास निश्चित आहे.
आपली,
डॉ. कविता मिलिंद म्हात्रे
नमस्कार, मी तुमची सौ. आर्या ओमनाथ नाटेकर
प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, सप्रेम नमस्कार.
मी सौ. आर्या ओमनाथ नाटेकर, भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत स्थानिक उमेदवार म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून, माझे पती श्री. ओमनाथ नाटेकर यांच्यासोबत अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहे. जनतेच्या प्रश्नांना समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याची प्रेरणा मला या कार्यातून मिळाली आहे.
महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा, स्वच्छता, शिक्षण तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर योग्य उपाय शोधणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून कामे मार्गी लावणे, हेच माझे कार्य राहिले आहे.
भाजप हा राष्ट्रहित, विकास आणि सुशासनावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. केंद्रात आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि राज्यात देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकार्याला महानगरपालिकेतही बळ देण्यासाठी तुमचा पाठिंबा अत्यावश्यक आहे.
आपल्या सहकार्याने प्रभागाचा सर्वांगीण, समतोल आणि शाश्वत विकास निश्चितच साधता येईल.
आपली,
सौ. आर्या ओमनाथ नाटेकर
राष्ट्र प्रथम
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि प्रभावी नेतृत्वाखाली गेल्या दशकात भारताने विश्वासाच्या अभावातून बाहेर पडत जागतिक स्तरावर विश्वासार्ह राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
२०४७ पर्यंत विकसित भारत उभारण्याची संकल्पना केवळ ध्येय न राहता, ती प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने ठोस पावले टाकत आहे.
संघटन द्वितीय
भारतीय जनसंघापासून सुरू झालेला आणि आज भारतीय जनता पक्ष म्हणून विस्तारलेला हा प्रवास भारत मातेला सर्वोच्च मानून राष्ट्रसेवेचा व्रत म्हणून पुढे नेला जात आहे.
राष्ट्रहित, सांस्कृतिक चेतना आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा संकल्प घेऊन भारतीय जनता पक्ष सदैव कार्यरत आहे.
व्यक्ति अंतिम
गेल्या पाव शतकापासून राष्ट्रहित, जनकल्याण आणि सांस्कृतिक मूल्ये या मूलभूत तत्वांवर आधारित मार्गावर चालताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष परिवारातील मार्गदर्शकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, कार्यकर्त्यांची निष्ठावंत साथ आणि जनतेचा विश्वास हाच आमचा खरा आधार ठरला आहे.
याच भक्कम पायावर पुढील वाटचाल आत्मविश्वासाने सुरू आहे.
प्रमुख विकासकामांचा आढावा
-
कोरोना काळात अन्नधान्य, औषधे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
-
रक्तदान शिबिरे व आरोग्य तपासणी शिबिरे
-
महिला बचत गटांना प्रोत्साहन व मार्गदर्शन
-
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप
-
धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
-
स्वच्छता अभियान व पर्यावरण संवर्धन उपक्रम
-
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सहाय्य
-
सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व सामाजिक उत्सवांचे आयोजन

आपली निशाणी – (कमळ)

आपली निशाणी – (कमळ)
पाणीपुरवठा व जलवाहिनी कामे
- आयरेगाव, समतानगर, बायोगॅस प्रकल्प रोड, बालाजी गार्डन, श्रीरामनगर, हनुमान गल्ली, टावर पाडा आदी भागांत नवीन जलवाहिन्या टाकून पाणीटंचाई कायमस्वरूपी सोडवली
- अनेक ठिकाणी स्वखर्चातून जलवाहिन्या टाकून नागरिकांना तातडीचा दिलासा
- काही भागांत २४ तास पाणीपुरवठा सुरू
रस्ते विकास व काँक्रीटीकरण
-
आयरेगाव ते हनुमान मंदिर, समतानगर, बालाजी गार्डन–डी.पी. रोड, द्वारका कॉलनी, टावर पाडा, ज्योतीनगर इ. भागांत रस्त्यांचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण
-
स्ट्रीटलाइट्स, ड्रेनेज लाईन, पेव्हर ब्लॉक्ससह सुरक्षित वाहतूक व्यवस्था
आरोग्य व स्वच्छता
-
आरोग्य केंद्रांची उभारणी व सुधारणा
-
नवीन स्वच्छतागृहे व शौचालये बांधली
-
कोविड काळात टेस्टिंग कॅम्प, जीवनावश्यक वस्तू वाटप, नागरिकांना वैद्यकीय मदत
शिक्षण, क्रीडा व सामाजिक सुविधा
-
ग्रंथालय (लायब्ररी), जिम, केडीएमसी शाळांचे नूतनीकरण
-
प्ले पार्क, विसर्जन तलाव, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान
-
बुद्ध विहार, सामाजिक सभागृह, सांस्कृतिक स्थळांचा विकास
सार्वजनिक सुविधा
-
तिकीट काऊंटर, नागरिक विश्रांती केंद्र
-
कोपर स्टेशन गार्डन व परिसर सुधारणा
पुढील विकासाचा संकल्प
-
मूलभूत सुविधांचा दर्जात्मक विकास
-
स्वच्छता, पाणीपुरवठा व रस्ते सुधारणा
-
महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुणांसाठी विशेष योजना
-
सुरक्षित, सुव्यवस्थित व आधुनिक डोंबिवली
-
पारदर्शक प्रशासन व लोकसहभाग
- अंडरग्राऊंड Electricity लाईन पावसाळ्यातील अडचण दूर करणे
- पाणी गळतीची समस्या योग्य पाणी पुरवठ्याचे नियोजन KDMC कडून योग्य काम करून घेणे
- झोपडपट्टी भागात पाण्याच्या पुरवठ्याचे नियोजन
- प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी IT Training / Computer ट्रैनिंग सुविधा उपलब्ध करून घेणे
- Cyber Crime जागृती & Digital Awareness

आपली निशाणी – (कमळ)

आपली निशाणी – (कमळ)
मतदारांना आवाहन
केंद्रात नरेंद्र मोदीजींचे सरकार आणि राज्यात देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखालील सरकार असताना,
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतही भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता आवश्यक आहे.
प्रभाग क्रमांक २९ मधील सर्व मतदार बंधू-भगिनींना नम्र आवाहन —
कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून
महायुतीच्या पॅनलला प्रचंड मतांनी विजयी करा.
🗳️ मतदान दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०
भाजपा कार्यालय – डोंबिवली
जनतेसाठी सदैव खुले
Copyright 2025, Dombivli Prabhag No. 29. All Rights Reserved.






